माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराचे आयोजन
तेल्हारा :: मनोज भगत (ता.प्र.) :::: श्री ज्ञान भास्कर सेवा संस्था हिंगणी खुर्द ई ६०७ द्वारा संचालित श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे गत १८ वर्षापासून सातत्याने आयोजित होत असणाऱ्या श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराचे सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिनांक १ /५ / २०२४ ते २० / ५ / २०२४ या कालखंडामध्ये भव्य प्रमाणात आयोजन केले आहे. सदर्हू शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच राज्याच्या सीमावर्ती राज्यातून सुमारे ६०० ते ७०० च्या वर मुले मुली निवासी स्वरूपामध्ये उपस्थित राहत असतात शिबिर गुरुकुल पद्धतीचे आणि निवासी तसेच पूर्णपणे विनामूल्य असून सातपुड्याच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी अगदी निसर्गाच्या सानिध्यात संपन्न होते.शिबिरामध्ये अध्यात्माबरोबरच बौद्धिक नैतिक सामाजिक व आर्थिक विकासा च्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्राप्त होते . तरी संस्कृतनिष्ठ भाविक सद्भक्तांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याचा विचार करून बालसंस्कार शिबिरा करता येत्या १ मे ला दुपारी १२ वाजेपर्यंत पोचवून त्याची रितसर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
शिबिरामध्ये प्रवेश घेतल्यानंतर कुठल्याही सबळ कारणाशिवाय विद्यार्थ्याला समारोपीय कार्यक्रमापर्यंत सुट्टी देण्यात येणार नाही तसेच पालक मेळाव्या व्यतिरिक्त इतर दिवशी शक्यतोवर पालकांनी विद्यार्थ्यांच्या भेटीकरता येऊन त्याचे शैक्षणिक वेळ वाया गमवू नये हि नम्र विनंती. शिबिरामध्ये विद्यार्थ्याला प्रवेश शुल्क आकारल्या जात नसून शिबिरातील शिक्षक सुद्धा विना मानधन तत्वावर पुर्णपणे सेवाभावीवृत्तीने कार्य करतात . तरी शिबिराच्या इतर व्यवस्थापनाकरिता लागत असणाऱ्या खर्चा करिता समाजातील दानशूर दात्याने प्रत्यक्ष शिबिराला भेट देऊन वा हस्ते पर हस्ते सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज भालतील यांनी केले आहे.
