Top News

लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर नागभीड तालुक्यात कांग्रेस ला मोठी खींडार.....

लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर नागभीड तालुक्यात कांग्रेस ला मोठी खींडार.....


काँग्रेस नेते तथा सरपंच सुनील वाघमारे यांच्यासह सहकाऱ्यांचा भाजपात प्रवेश.....


तालुक्यात काॅंग्रेसला गळती तर भाजपा मध्ये भरती सुरुच....



आज दि.१० एप्रिल ला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया हे गडचिरोली - चिमूर लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ नागभीड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तालुक्यातील काॅंग्रेस च्या सरपंचांनी थेट आमदार बांगडी या यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केल्याने अनेकांना झटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या 3 महिन्या पासुन सतत चिमूर विधानसभा क्षेत्रात काॅंग्रेस ला गळती लागली असुन अनेक सरपंच उपसरपंच तसेच काॅंग्रेस नेते भाजपात प्रवेश करतानाचे चित्र दिसत आहे‌.


 विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड


आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभीड तालुक्यातील भाजपा कांपा-मौशी जिल्हा परिषद क्षेत्रातील कोटगांव येथे चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. अशोक नेते यांच्या प्रचारार्थ भाजपा-महायुतीची कॉर्नर सभा पार पडली. या कॉर्नर सभेप्रसंगी आमदार बंटी भांगडीया यांच्या उपस्थित ग्रामस्थांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात विविध विषयांवर संबोधित केले. तसेच, गावात मनरेगा अंतर्गत विकासकाम सुरू असताना कार्यस्थळावरील मजूर बंधू-भगिनींशी आपुलकीने संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेत सर्वांना आश्वस्त केले. दरम्यान, ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी आमदार बंटी भांगडीया यांचे आगमनाप्रसंगी उपस्थित माता-भगिनींनी उत्स्फूर्तपणे औक्षण करत स्वागत केले. 



या कॉर्नर सभेप्रसंगी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर व भारतीय जनता पार्टीच्या विकसनशील ध्येय-धोरणांवर प्रभावित होऊन तसेच, आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या नेतृत्वात झालेला चिमूर विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व समाजकार्यावर विश्वास ठेवून काँग्रेस नेते तथा कोटगाव ग्रामपंचायतचे सरपंच सुनील वाघमारे यांच्यासह सहकाऱ्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले व अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या लोकसभा निवडणुकीत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांची साथ हवी असून भाजपा-महायुतीने अबकी बार ४०० पार असा निर्धार केलेला आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भाजपा-महायुतीचे उमेदवार  अशोक नेते यांना भरघोस मताधिक्याने तिसऱ्यांदा विजयी करा. भाजपा-महायुतीलाच आपला मतरुपी आशीर्वाद आणि समर्थन देण्याचे आवाहन आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी समस्त मतदारांना केले. यावेळी ओडिसी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, तालुका अध्यक्ष संतोष रडके, कृ.उ.बा.स.नागभीड चे सभापती आवेश पठाण, न.प.नागभीड चे माजी सभापती सचिन आकूलवार, भाजपा नेते ऍड‌.रविंद्र चौधरी सह समस्त भाजपा नेते, पदाधिकारी,बुथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख तथा कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post