Top News

भाजपा महिला आघाडी नागभीड च्या वतीने भव्य हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित.....

भाजपा महिला आघाडी नागभीड च्या वतीने भव्य हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित.....




विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

मकर संक्रांती निमित्त भाजपा महिला आघाडी नागभीड व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्या सहकार्याने तालुक्यातील समस्थ महिला भगिनिसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन ट्विंकल इंग्लिश स्कूल येथे व युवकांसाठी भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन को - ऑपेरेटिव्ह बँक समोरील पटांगणात दिनांक 11/02/2024 सकाळी 11.00 वाजता करण्यात  आले आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांना बोलवण्यात आले आहे. 



 तर प्रमुख उपस्थिती म्हणून अशोक नेते,खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा, वसंत वार्जुरकर जेष्ठ नेते, राजु देवतळे उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी आघाडी, मेघा भांगडीया संचालिका भांगडीया फाऊंडेशन, संजय गजपुरे जिल्हा संघटन महामंत्री, संतोष रडके तालुकाध्यक्ष,आवेश पठाण सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,ममता डुकरे माजी जी. प सदस्य,दिपाली मेश्राम माजी जी. प.सदस्य, अल्का आत्राम सचिव भाजपा महाराष्ट्र प्रदेश, शिवानि दाणी युवा नेत्या,अपर्णा भांगडिया संचालिका भांगडीया फाऊंडेशन, गणेश तर्वेकर विधानसभा प्रमुख, प्रा.उमाजी हिरे माजी नगराध्यक्ष, सचिन आकुलवार,माजी बांधकाम सभापती, पद्मा कामडी माजी जी. प.सदस्य, लीना पेंदाम माजी जी. प. सदस्या या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

तरी महिला आघाडी नागभीड च्या वतीने  इंदु आंबोरकर अध्यक्षा महिला आघाडी यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त महिला भगिनींना हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हाहन केले आहे.

Previous Post Next Post