ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेट- प्रेरणा महाविद्यालयाची शैक्षणिक सहल उत्सहात संपन्न
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना ( ता. प्र. ) रोशन आस्वले
प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयाची शैक्षणिक सहल प्राचार्य नानेश्वर धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. इजाज शेख, प्रा. राहुल ठोंबरे, प्रा. मनीषा मरस्कोल्हे प्रा. सचिन पवार, कुंजन यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 27 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान गडचांदूर ते औरंगाबाद अशी नुकतीच पार पडली. सहलीमध्ये एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहलीतील विद्यार्थ्यांनी प्राध्यापका समवेत विविध धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. यामध्ये अजंठा-वेरूळ लेणी ,खुलताबाद, दौलताबाद किल्ला,बीबी का मकबरा, प्राणी संग्रालय, लोणार सरोवर, सिंदखेड राजा येथील माँ जिजाऊ जन्मस्थल, घुनेश्वर ज्योतिर्लिंग ला भेट दिली. सदर शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विध्यार्थ्यानी महाराष्ट्र राज्यातील अनोमल अशा वारसा स्थलांना भेट देऊन त्याचे महत्व जाणून घ्यावे. व त्यामधून ऐतिहासिक स्थलांचे जतन करणे का अनिवार्य आहे याची जाणीव व्हावी हा उद्देश होता. सदर सहलीला युगचेतना बहुउद्देशिय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. राजकुमार मुसने , व रमेश राठोड , अरविंद मुसने यांचे विशेष सहकार्य लाभले.
