आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, डॉ. वनिता गिरीपुंजे, विमल गिरीपुंजे व शुभांगी गिरीपुंजे यांचा वाढदिवस केक कापून संयुक्तरित्या साजरा......
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
▪️दि. १ फेब्रुवारी/ आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभीड येथील विलास गिरीपुंजे यांच्या निवासस्थानी भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, डॉ. वनिता गिरीपुंजे, विमल गिरीपुंजे व शुभांगी गिरीपुंजे यांचा वाढदिवस केक कापून संयुक्तरित्या साजरा करण्यात आला. यावेळी आमदार बंटी भांगडीया यांनी चौघांनाही केक भरवून वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित मान्यवरांशी वार्तालाप केला.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, भाजपा नेते जहांगीर कुरेशी, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा इंदु आंबोरकर, धनराज काटेखाये, विलास गिरिपुंजे व समस्त गिरिपुंजे परिवार आणि अन्य भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

