सावळी सदोबा येथे नविन पोलीस स्टेशन करीता नागरिकांची मागणी
शहीद पत्नी कुंन्ता आडे यांनी पोलीस महासंचालकांना भेटून दिले लेखी निवेदन
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी : हिरासिंग राठोड (ता.प्र)
पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा हा परिसर अतिदुर्गम व आदिवासी बहुल परिसर म्हणून शासन दप्तरी नोंद आहे,मागील अनेक दिवसापासून सावळी सदोबा पोलीस दूरक्षेत्राला पोलीस स्टेशनचा दर्जा देण्यात यावा आणि पोलीस स्टेशन व्हावे अशी मागणी जोर धरत आहे,सावळी सदोबा पोलीस दूरक्षेत्रा अंतर्गत एकुण ४२ गावे येत असून,या सर्व गावांचा समावेश आर्णी तालुक्यात आहे,या परिसरातील नागरिकांना फौजदारी न्यायालय घाटंजी आहे तर दिवाणी न्यायालय आर्णी येथे आहेत,सावळी सदोबा वरून पारवा पोलीस स्टेशनचे अंतर ४० किलोमीटर आहे,आर्णी ३० किलोमीटर आहे,या परिसरातील नागरिकांना पोलीस स्टेशनची कामे घाटंजी येथून करावी लागत आहे तर,महसूल ची कामे आर्णी तालुक्यातून करावी लागत आहे,त्यामुळे सावळी सदोबा परिसरातील नागरिकांना घाटंजी व आर्णी या दोन तालुक्यात जाऊन आपली कामे करत असताना मोठी कसरत करावी लागत आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे,सावळी सदोबा पोलीस दूरक्षेत्राला नविन पोलीस स्टेशनची निर्मिती केल्यास या परिसरातील ४२ गावांना आर्णी तालुक्यात काम करण्यास सोपे जाईल,त्यामुळे सावळी सदोबा येथे नविन पोलीस स्टेशन देण्यात यावे,याकरिता महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकाला शहीद पत्नी कुंतीताई आडे यांच्याकडून लेखी निवेदन देण्यात आले आहेत,सावळीसदोबासह परिसरातील गावांची लोकसंख्या जवळपास ५० ते ६० हजार असून, एवढ्या लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी फक्त पाच पोलीस कर्मचारी दिमतीला आहेत. त्यामुळे वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि गावातील व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यात यावे,अशी मागणी कृष्णनगर येथील शहीद वीर पत्नी कुंन्तीताई आडे यांनी पोलीस महासंचालकाला दिलेल्या निवेदनातून केली आहे,जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सावळी सदोबा हे आर्णी तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव आहे.परिसरात लहान मोठी ४३ गावे आहेत. सामाजिक आणि राजकीय दृष्टीने हा परिसर संवेदनशील आहे.तरीही सावळी सदोबा दूरक्षेत्राला केवळ पोलीस दूरक्षेत्र आहे. या पोलीस दूरक्षेत्र असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे.त्यात एक पोलीस उपनिरीक्षक,तीन पोलीस कॉन्स्टेबल,महिला पोलिस कर्मचारी असल्याने त्या कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारचे सण,निवडणुका,कायदा सुव्यवस्था,यात्रा,रात्रीची गस्त, गुन्हे तपास,चौकशी अर्ज,शालांत परीक्षा बंदोबस्त,समन्स बजावणे, अकस्मात मृत्यूची चौकशी,अपघात,वेगवेगळ्या दैनंदिन कामांचा ताण पडत आहे.या परिसरात जवळजवळ ५०ते ६० हजार नागरीक राहतात. पोलीस कर्मचारी फक्त पाच आहेत.त्यामुळे सावळी सदोबा दूरक्षेत्राला स्वतंत्र पोलीस स्टेशन मिळावे, यासंदर्भात कृष्णनगर येथील शहीद पत्नी कुंन्तीताई आडे यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना मुंबई येथे भेटून या संदर्भात चर्चा करून लेखी निवेदन दिले आहेत .
