Top News

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नगरपरिषद बल्हारशाह तर्फे शिवकालीन वेशभूषा स्पर्धा संपन्न....

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नगरपरिषद बल्हारशाह तर्फे शिवकालीन वेशभूषा स्पर्धा संपन्न....




विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

 "शिवकालीन वेशभूषा स्पर्धा" छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नगरपरिषद बल्हारशाह तर्फे दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी बल्हारशाह मधील शाळेतील मुलांकरिता "शिवकालीन वेशभूषा स्पर्धा" जुना तालुका क्रीडा संकुल, बल्हारशाह येथे आयोजित करण्यात आलेली होती. सदर स्पर्धेची सुरुवात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  विशाल वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून केली. स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद मिळालेला असून जवळपास १५० विद्यार्थ्यानी शिवकालीन वेशभूषा स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.  



नगरपरिषद बल्हारशाहचे  मुख्याधिकारी  विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि अंमलबजावणी  रीना बहोत,  दिपक पंडित, प्रशांत गनवीर, श्रीनिवास रायला,  मंगेश सोनटक्के, मनोज डोमळे, अर्जुन वैरागडे आणि  अमोल रामटेके यांनी पार पाडले. सदर कार्यक्रमास इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनीही उपस्थित राहून सहाय्य केले. 



स्पर्धेत वेशभूषा परीक्षक म्हणून “रणरागिनी हिरकणी संस्था, बल्हारशाह” मधून संस्थेच्या अध्यक्षा  संजना राजेश मूलचंदाणी आणि संस्थेच्या सदस्या  पूजल रोहरा पंजवाणी यांना आमंत्रित करण्यात आले होते. 

स्पर्धेत निपक्ष पद्धतीने निर्णय व्हावा याकरिता सर्व स्पर्धकाना केवळ नंबर देण्यात आले होते तसेच परीक्षकांची नावेही निकाल जाहीर होईपर्यंत गोपनीय ठेवण्यात आली होते. 

सदर स्पर्धेत गट-अ (१ली ते ७वी) मध्ये प्रथम क्रमांक आराध्य सज्जनवार, द्वितीय क्रमांक ओमी येगीनवार व तृतीय क्रमांक रेहान सलीम अली यांनी पटकावला. गट-ब (८वी ते १२वी) मध्ये प्रथम क्रमांक नियती देविदास बोरकर, द्वितीय क्रमांक साईना योगेश वडलकोंडावार व तृतीय क्रमांक शरवरी तेजपाल मानकर यांनी पटकाविला. स्पर्धेतील विजेत्यानं रोख पारितोषिक तसेच इतर सर्व स्पर्धकाना भेटवस्तु देण्यात आल्या. सर्व विजेत्याना तसेच इतर स्पर्धकांना मा. मुख्याधिकारी  विशाल वाघ यांच्यातर्फ शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post Next Post