Top News

पुन्हा एका हत्येने जिल्हा हादरला....घरगुती वादातून आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार

पुन्हा एका हत्येने जिल्हा हादरला....घरगुती वादातून आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार


आई जागीच ठार तर वडील गंभीर जखमी.... 


जिल्हात फेब्रुवारी महिन्यातील हत्येची हि पाचवी घटना 




विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना

चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून हत्येचे सत्र सुरू आहे. ब्रम्हपुरी, गोंडपिपरी, बल्हारशाह , चंद्रपुर नंतर आता कोरपना तालुक्यात घरगुती वादातून हत्या झाल्याच्या घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातील हि ५वी हत्या आहे.

21 फेब्रुवारीला कोरपना तालुक्यातील लोणी गावातील रहवाशी मुलाने घरगुती वादातून आई-वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात आई कमलाबाई पांडुरंग सातपुते या जागीच ठार झाल्या असुन वडील पांडुरंग सातपुते हे गंभीर जखमी झाले आहेत. वडील पांडुरंग सातपुते ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे प्राथमिक उपचार दरम्यान प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे रेफर केले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली असुन. आरोपी मुलगा मनोज सातपुते याला पोलिसांनी अटक केल्याची सुत्राची माहिती आहे. कोरपना पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.

Previous Post Next Post