आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांची नागभीड तालुक्यातील डोंगरगाव (बु.) येथे शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ कार्यक्रमाला उपस्थिती
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी नागभीड तालुक्यातील डोंगरगाव (बु.) येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समीतीच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ व सप्तखंजेरी वादक ह.भ.प. श्री आकाश दादा टाले महाराज यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थिती दर्शविली.
याप्रसंगी सर्वप्रथम छत्रपती श्री शिवाजी महाराज व सर्व थोर संत महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तथा दीपप्रज्वलन करून विनम्र अभिवादन केले आणि उपस्थित शिवभक्तांशी विविध विषयांवर संवाद साधून मंगलमय शुभेच्छा दिल्या. तसेच, आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते सप्तखंजेरी वादक ह.भ.प. श्री आकाश टाले महाराज यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, समस्त डोंगरगाव (बु.) ग्रामवासीयांच्या वतीने आमदार बंटी भांगडीया यांचे आगमनाप्रसंगी उपस्थित माता-भगिनींनी औक्षण करत स्वागत केले आणि शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या शिवजन्मोत्सव सोहळ्याला प्रामुख्याने सप्तखंजेरी वादक ह.भ.प. श्री आकाश टाले महाराज, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, भाजपा ज्येष्ठ नेते भिमराव ठावरी, भाजपा ज्येष्ठ नेते विलास डांगे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, माजी बांधकाम सभापती/नगरसेवक न. प. नागभीड सचिन आकूलवार, भाजपा नेते जहांगीर कुरेशी, भाजपा नेते रमेश ठाकरे, भाजयुमो चिमूर तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजयुमो चिमूर तालुका महामंत्री रोशन बन्सोड, बंडू गेडाम, धनराज काटेखाये, संजय मालोदे, प्रफुल लांबट, दिनेश समर्थ, प्रविण गिरीपुंजे, कुणाल कावरे, विजय संदोकर, शुभम चिल्लोरे, जनार्धन रामटेके, प्रकाश पातोळे, काशिनाथ शेंडे, देविदास ढोक, शिल्पा कोरे, निता बोरकर, सुमित्रा गायधने, किशोर हेमने, काजल कोसे, बंटी कोसे, हिराबाई हेमने, गणेश मेश्राम, अजय कोसे, संघरत्न कोसे, विश्वरत्न कोसे, महेश कोसे व अन्य मान्यवर आणि शिवभक्त डोंगरगाव (बु.) वासीय ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

