Top News

गाव चलो अभियान - तोहोगाव ता.गोंडपिपरी

गाव चलो अभियान -  तोहोगाव ता.गोंडपिपरी




विदर्भ माझा न्युज 24 - गोंडपिपरी

भाजपच्या वतीने 'गाव चलो अभियान' राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या विकासकामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद व्हावा, योजनांचे फलित कळावे यासाठी    देवराव  भोंगळे  यांचे नेतृत्वात   राजुरा विधानसभा मतदारसंघातील गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव  येथिल बूथ क्र 238,239 व 240 या तीन बूथ ची रचनात्मक काम करण्यात आले.यादरम्यान नागरिकांशी संवाद साधून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती दिली. यावेळी सरकारच्या विविध योजनांचे लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी स्वतः मत व्यक्त केले.  नागरिकानी सरकारच्या अनेक हितकारक योजनांबद्दल समाधानकारक मत व्यक्त केले तोहोगाव येथे प्रभारी म्हणून पक्षाने पाठवलेले भाजपाचे नेते तसेच नगरपंचायत गोंडपिपरी नगरसेवक राकेश पून तसेच किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, गणेश डहाळे, प्रकाश रापलवार  यांच्यासह भाजपचे योगेश खामनकर , राहूल खोब्रागडे, अतूल बूक्कावार , बंडू दूर्गे , संदिप बूक्कावार , अजय जिरकूंटवार , सौरभ मोरे , आशिष मोरे, रमेश राऊत , यश उत्तरवार , गणपत धोटे , देवराव टेकाम ,संजय धोटे , प्रदिप निवलकर व पदाधिकारी-कार्यकर्ते सक्रियतेने या अभियानात सहभागी झाले होते.



Previous Post Next Post