Top News

शेळ्या चराईसाठी गेलेल्या इसमाच्या माहिती वरून अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश....

शेळ्या चराईसाठी गेलेल्या इसमाच्या माहिती वरून अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश....




विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

 बल्हारशाह पेपर मिल वसाहत व विसापूर शेतशिवारात शेतकऱ्यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन घडले होते. यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवार १७ दुपारी ३ वाजता दरम्यान शेळ्या चराईसाठी गेलेल्या इसमाला विसापूर शेतशिवाराजवळ नाल्याशेजारी एका झुडूपात बिबट असल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती वन विभागला दिली. वन विभागाच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न करून बिबट जेरबंद करण्यास यश मिळविले.

ही कारवाई बल्हारशाह  विभागाने शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता दरम्यान विसापूरच्या शेतशिवारात केली.

मागील काही दिवसापासून एका बिबट्याचा वावर बल्हारशाह पेपर मिल वसाहत,जुने पावर हॉउस परिसर व बल्लारपूर- विसापूर मार्गावरील शेतशिवारात असल्याचे दिसून आले होते. यामुळे ये- जा करणाऱ्या नागरिकांत व शेतशिवारात कामाला जाणाऱ्या मजुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच आज शनिवारी विसापूर येथील दिलीप टोंगे यांच्या शेताजवळील नाल्याशेजारी एका झुडूपात बिबट दडी मारून असल्याचे भाऊजी डाहुले हे शेळ्या चारत असताना बिबट दिसला. त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. ही माहिती मिळताच बल्लारशाह वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी बिबट हालचाल करून केवळ डरकाळी देत होता. तो जाग्यावरून हलत नव्हता. तो बिबट अशक्त दिसून येत होता.कदाचित त्याला मार लागला असावा.

त्यानंतर बिबट या वन्यप्राण्यास बेशुध्द करुन रेस्क्यु करण्यात आले. बिबट हा नर असुन त्याचे वय अंदाजे ३ वर्षे इतके होते. तो जखमी असल्याने त्याला पुढील उपचारा करीता वन्यजीव उपचार केन्द्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले. त्याचेवर कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी हे उपचार करीत आहे.

यावेळी स्वेता बोड्डु, उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात आदेशकुमार शेंडगे, सहाय्यक वनसंरक्षक यांचे उपस्थितीत सदर मोहीम यशस्वी करण्याकरीता नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह  के.एन. घुगलोत, क्षेत्र सहाय्यक, बल्हारशाह, वनरक्षक वर्षा पिपरे, उषा घोडवे, एस.एम. बोकडे, आर.एस. दुर्योधन व अति शिघ्र दल, चंद्रपुर येथील कर्मचारी यांनी परिश्रम केले.

Previous Post Next Post