Top News

बाळासाहेब कबड्डी चषक 2024 चे थाटामाटात उदघाटन

बाळासाहेब कबड्डी चषक 2024 चे थाटामाटात उदघाटन


पाचगाव येथील कबड्डी स्पर्धेला खेडाळुंचा उत्स्फूर्थ प्रतिसाद


गावहितासाठी 24×7 आवाज द्या सदैव तत्पर राहील -शिवसेना नेते बबन उरकुडे



विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर /राजुरा : मनोज श्रीहरी गोरे ।  उपजिल्हा प्रतिनिधी 

आदर्श क्रीडा मंडळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा पाचगाव आयोजित बाळासाहेब कबड्डी चषक स्पर्धेचे उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उदघाटक म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना पक्ष पात बाजूला ठेवून कुठलीही मदत करायला मी कठीबद्ध आहे. आणि माझ्या या गावाच्या कुठल्याही समस्यांसाठी माझ्या पदाचा पुरेपूर वापर करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न अशी ग्वाही बबन उरकुडे यांनी दिली.

याप्रसंगी ग्रा. प. सदस्य बापूराव मडावी यांनी आयोजक मंडळाला शुभेच्या दिल्या.

तसेच प्रमुख अतिथी म्हणून आशा बबन उरकुडे सरपंच गोवरी, प्रवीण अस्वले, कल्पना काकडे ग्रा प सदस्य, मनोज कुरवटकर ग्रा. प सदस्य, विजय जाबोर, उद्धव चौधरी,दयाराम डोंगे, जंगा राय सिडाम,लक्ष्मन नुलावार,दशरथ भोयर,कलाबाई इंदूरवार,बंडु कुरवटकर,गोविंदा काकडे,गजानन भेंडे, सुनिल वरारकार,प्रकाश कोहपरे,कविश्वर बोबडे,नाना विरदंडे,मनोहर बोबडे,दिनकर जिवतोडे,गजेंद्र पिदूरकर,मारोती जाबोर, अनिल भोयर, अरुण चिडे, प्रदीप खाडे, रवींद्र बोबडे,दत्ता पेंदोर, मानकु कुमरे, संतोष कोवे सर्व सदस्यगन  आणि मोठ्या संख्येने गावकरी पुरुष महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे संचालन रुपेश पुलगमवार यांनी केले तर आभार मनोज  कुरवटकर यांनी व्यक्त केले.

Previous Post Next Post