Top News

आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांच्या शुभहस्ते नागभीड नगर परिषद क्षेत्रातील तुकुम येथे बुद्ध विहाराच्या नवीन इमारत बांधकामाचा शुभारंभ

आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांच्या शुभहस्ते नागभीड नगर परिषद क्षेत्रातील तुकुम येथे बुद्ध विहाराच्या नवीन इमारत बांधकामाचा शुभारंभ



विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते नागभीड नगर परिषद क्षेत्रातील तुकुम येथे बुद्ध विहाराच्या नवीन इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार बंटी भांगडीया यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती/प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले आणि उपस्थित समाजबांधवांना विविध विषयांवर संबोधित केले. दरम्यान, समस्त बौध्द समाजाच्या वतीने आमदार बंटी भांगडीया यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.

या भूमिपूजन सोहळ्याला प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, रा.का. तालुकाध्यक्ष विनोद नवघडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, माजी बांधकाम सभापती/नगरसेवक न. प. नागभीड सचिन आकुलवार, क्रिष्णा गंजेवार, प्रकाश गजबे, चंद्रशेखर गजबे, जितू चौधरी, श्रीराम बनकर, दिवाकर बनकर, दिनकर डांगे व अन्य भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि बौद्ध समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post