Top News

प्रेरणा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा.

प्रेरणा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा.



विदर्भ माझा न्युज 24 -  कोरपना : रोशन आस्वले तालुका प्रतिनिधी

गडचांदुर येथील प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयात  दि 25 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य नानेश्र्वर धोटे, अरविंद मुसने,प्रा.राहुल ठोंबरे, प्रा. मनीषा मरसकोल्हे,प्रा.सचिन पवार,प्रा. श्रीकांत घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना प्राचार्य नानेश्र्वर धोटे म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही आपली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सुज्ञ लोकप्रतिनिधी आपण मतदानाच्या माध्यमातून निवडून देणे गरजेचे आहे. सुशासन आणि उत्तम प्रशासन यावर प्रत्येक भारतीय नागरीकाचा अधिकार आहे. याबाबतची जागरूकता मतदार दिनाच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून याद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे आवाहन यांनी केले.

प्रा. राहुल ठोंबरे भाषणात म्हणाले की, आपली समृद्ध लोकशाही ही राजकीय पक्ष व मतदार यावर टिकून आहे. देशातील प्रत्येक नागरीकाने मतदानाचा हक्क बजावून चांगले लोकप्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे. त्यामुळे महासत्येचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल असा विश्वास यांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मनीषा मरसकोल्हे यांनी केले.संचालन रुपाली टेकाम हिने तर आभार प्रफुल मांडवकर याने मानले.

Previous Post Next Post