माथा येथे श्री. दत्त जयंती उत्सवाचे आयोजन : आ. सुभाष धोटेंनी दर्शन घेऊन भाविकांशी साधला संवाद.
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर/ कोरपना : रोशन आस्वले : तालुका प्रतिनिधी
श्री दत्त मंदिर गणेश मोड देवघाटनाला, माथा, तालुका कोरपना येथे श्री. दत्त संस्थान च्या वतीने श्री दत्त जयंती उत्सवाचे दिनांक २५ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२३ यादरम्यान तिन दिवसीय आयोजन करण्यात आले. दि. २७ डिसेंबर रोजी आमदार सुभाष धोटे यांनी श्री दत्त मंदिर देवस्थान येथे भेट देऊन दत्त गुरु दत्तांचे दर्शन घेतले आरतीमध्ये सहभाग घेतला आणि मार्गदर्शन केले. आयोजन समितीच्या वतीने आ. धोटे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आ. धोटे यांच्या हस्ते विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
यानिमित्ताने हभप भुसारी महाराज यांच्या हस्ते व नानाजी लांडे यांच्या उपस्थितीत विधिवत घटस्थापना, सामुदायिक ध्यान, आरती, पूजा पाठ करण्यात आले. हभप डाकरे महाराज वडगाव यांचे जाहीर काल्याचे किर्तन दहीहंडी काला करण्यात आले. किन्हाके महाराज, जाधव महाराज यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सुरेश मालेकर, घनश्याम नांदेकर, कामानंद ठाकरे, सतीश डाहुले, नगरपंचायत सभापती निसार शेख, राजाबाबू गलगट, कृ. उ. बा. स. संचालक इरफानभाई यासह आयोजन समिती पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
