Top News

कळमना येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सी. सी. टिव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण.. At Kalmana by Sarpanch Nandkishore Gadhai C. C. Launch of TV camera..

कळमना येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सी. सी. टिव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण..


विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा : उपजिल्हा प्रतिनिधी : मनोज श्रीहरी गोरे


 राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सी. सी. टिव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले

         या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील जनतेचा आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन सी. सी. टिव्ही कॅमेरे लावण्यात आले. कळमना येथे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात अशाच प्रकारे जनतेची सेवा करीत राहिल अशी ग्वाही दिली. 

            या प्रसंगी उपसरपंच कौशल्या कावळे, ग्राम पंचायत सदस्य रंजना दिवाकर पिंगे, पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजणे, ग्राम सेवक मरापे, जेष्ठ नागरिक सुधाकर पिंपळशेळे, उध्दव आसवले, लटारी बल्की, देवराव ताजणे, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते दत्ता पिंपळशेळे, मदन वाढई, विठ्ठल विददे, कवडु गौरकार, गणपती कुकडे, नवनाथ ताजणे, अरुण आस्वले, मारोती वाढई, सतीश आबिलकर, लक्ष्मण आताम, मारोती खाडे, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे, प्रविण भेडारे, विनोद सिडाम, ज्ञानेश्वर वाढरे यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post