Breaking News_बल्हारशाह शहरात युवकाची हत्या....एक गंभीर जखमी.......5 आरोपी अटकेत.....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
काल दि. 6 नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास बल्हारशाह शहरात एका युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
शहरातील टेकडी विभागातील विद्यानगर वार्डातील पंचशील चौकात रात्रीच्या सुमारास 5 जणांनी पैश्याचा वादातून लाला तोडसाम नामक युवकाला बेदम मारहाण केली, लाठी, फरशी व दगडाने त्या युवकावर अनेक प्रहार करण्यात आले, यामध्ये त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सोबती अमोल देवगठे हा गंभीर जखमी असुन त्याला रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत बल्हारशाह पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, हत्या प्रकरणातील 5 आरोपीना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे. घटनेचा अधीक तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात बल्हारशाह पोलिस करीत आहे.
