शहीद ज्ञानेश्वर आडे यांचा स्मृतिदिन सोहळ्याचे आयोजन।
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
आर्णी तालुक्यातील कृष्णानगर तांडा येथील शहीद ज्ञानेश्वर आडे यांच्या स्मृतिदिन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.8/10/2023 रोजी करण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीर येथे लष्कर-ए-तोयबा या आतंकवाद्यांशी लढताना शहीद ज्ञानेश्वर आडे यांना विरमरण आले होते, शहीद ज्ञानेश्वर आडे यांनी देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राण्याची आहुती दिली, त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना मरणोपरांत राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अशा वीर शहिदाचा स्मृतिदिन सोहळा दिनांक 08/10/2002 रोजी स्मृती प्रित्यर्थ रविवारला कृष्णनगर येथे स्मृतिदिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. स्मृतिदिन सोहळा कार्यक्रमाला परिसरातील समस्त नागरिकांनी उपस्थित राहाव अशी नम्र विनंती कृष्णनगर तांडा येथील शहीद पत्नी कुंती आडे व आडे परिवाराकडून करण्यात येत आहे.

