शेती शिवारात वीज पडून एका महिलेचा मृत्यू तर दोन जण जखमी
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
मूल तालुक्यातील चीचाळा येथे वैरागडे नामक यांचा शेतात धानपिकामध्ये निंदा काढण्याचे काम सुरू होते. गावातील काही मजूर महिला त्यांच्याकडे कामा करिता शेतात गेले होते. अचानक झालेल्या दुपारी विजेचा कडकडासह पाऊस सुरू झाला. विजेचा कडकडाड इतका मोठा होता की त्या शेतात वीज पडली असता तेथे काम करीत असलेली महिला चंद्रकला संजय वैरागडे हीचा जागीच मृत्यू झाला व इतर दोन महिला गंभीर जखमी झाले असून त्यांना मूल उपजिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

