Top News

The dead body of a 65-year-old man from the hill division was found in the forest behind Sainik School.

टेकडी विभागातील 65 वर्षीय वृद्धाचा मृत्युदेह सैनिक शाळेच्या मागच्या परिसरातील जंगलात आढळला......


घातपात की वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यु ? 



 विदर्भ माझा न्यूज 24 - बल्हारशाह 

बल्हारशाह शहरातील टेकडी विभागा अंतर्गत येत असलेल्या विद्यानगर वार्डातील रहिवाशी गणपत रघुनाथ चंदनखेडे (65) तीन दिवसापुर्वी सरपण आणण्याकरिता सैनिक शाळेच्या मागचा परिसरातल्या जंगलात गेले होते तेव्हापासून ते घरी परतले नाही. काल दि.31जुलै2023 ला सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास काही लोक जंगलात गेले असता त्यांना रघुनाथ चंदनखेडे यांचा मृतदेह आढळून आला. 

सदर मृत रघुनाथ चंदनखेडे ओळखीचे असल्याने त्यांनी घरचाना माहिती दिली घरच्यांनी पोलीस आणि वनविभाग यांना कळविले. पोलीस आणि वनविभाग यांचे चमु घटनास्थळी दाखल झाले, घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन करीता पाठवण्यात आले, वनविभागाच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी कोणतेही वन्य प्राण्याचे पदचिन्ह आढळले नाही. मागील काही दिवसांपासून पाऊस असल्याने त्या परिसरात वन्य प्राणी आले असते तर त्यांच्या पाऊल खुणांमधे पाणी साचले असते. त्यामुळे हा मृत्यु वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झाला असण्याची शक्यता धूसर आहे. पोलीस विभाग देखिल घातपाताचा दिशेने तपास करीत आहे. 

मृत रघुनाथ चंदनखेडे यांना तीन मुली व एक मुलगा असुन त्यांनी सांगितले की त्यांचे वडील बरेचदा दोन तीन दिवस घरी येत नव्हते व ते कधी मंदिरात तर कधी बस स्टॅन्ड परिसरात झोपायचे त्यामुळे त्यांनी वडील हरवल्याची तक्रार दिली नव्हती मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यावरच नेमका मृत्यु कशाने झाला हे स्पष्ट होईल.

Previous Post Next Post