Top News

WCL should stop the plight of Chandanwahi-Kalmana road: Sarpanch Nandkishore Gadhai

वेकोलीने चंदनवाही - कळमना मार्गाची दुर्दशा थांबवावी : सरपंच नंदकिशोर वाढई



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


 राजुरा- गोवरी हा राज्य महामार्ग बंद असल्याकारणाने त्या मार्गावरची वाहतूक ही थांबलेली आहे. त्या मार्गावरील वाहने चंदनवाही - कळमना या मार्गावरून वळती झालेले आहे. या मार्गावर खूप मोठा ट्राफिक वाढलेला असून चंदनवाही - कळमना हा अंतर्गत पोच मार्ग आहे. या मार्गाची वाहनाची कॅपिसिटी बघता या मार्गावर जास्त वाहने तसेच क्षमतेपेक्षा जास्त वजनदार वाहणे धावली गेली तर निश्चितपणाने या मार्गाची सुद्धा दुरावस्था झाल्याशिवाय राहणार नाही. कळमना या गावाच्या अवतीभवती डब्ल्यूसीएलच्या खाणी आहेत. आणि या खाणीमध्ये काम करणारा प्रचंड कर्मचारी वर्ग, मोठ मोठ्या मशनरी व त्या खाणीला लागणारा कच्चामाल व खाणीऊ मधून उचललेला पक्का माल या सगळ्याची वाहतूक मौजा कळमना या गावातून होत असून हे निश्चितपणाने अपघाताला सुद्धा आमंत्रण देणारे आहे. कारण हा रस्ता मौजा कळमना येथील गावामधून दुभागलेला आहे. म्हणून या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे तरी या  परिस्थितीमुळे कळमना गावावर जे संकट उद्भवलेले आहे. शासकीय यंत्रणेने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. वेकोलीने यात लक्ष घालून चंदनवाही - कळमना मार्गावरची ही वाहणांची वर्दळ थांबवली पाहिजे अशी मागणी मौजा कळमना चे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी केली आहे. अन्यथा गावकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

Previous Post Next Post