सावळी सदोबा येथे अवैध पार्किंग व्यवस्थेमुळे व्यापारी व नागरिक त्रस्त.....
वाहनतळ नसल्याने वाहतुक कोंडीला जवाबदार कोण.....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जाणारा सावळी सदोबा येथे अवैध पार्किंग व्यवस्थेमुळे व्यापारी वर्ग तथा नागरिक त्रस्त झाले आहेत, सावळी सदोबा येथे केव्हाही वाहतूकीची कोंडी होत आहे,या परिसरामध्ये दुचाकी तथा चार चाकी वाहणांची मोठ्या प्रमाणात संख्या आहेत,गाड्या पार्क करण्यासाठी वाहनतळ नसल्याने,वाहन चालक रस्त्यावरच आपल्या गाड्या उभ्या ठेवतात,याचा फटका व्यापारी तथा नागरिकांना बसत आहे,रस्ता लहान असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे,वाढत्या वाहन संकेत सोबत वाहनतळाची ही गरज आहे, वाहन चालक रस्त्यावर कुठेही आपली गाडी उभी केलेली तसेच छोट्या रस्त्यावरही दुतर्फा पार केलेली वाहने कोंडीची महत्त्वाचे कारण ठरत आहे, पोलिसांकडून या अवैध पार्किंग वर कारवाई केली जात नाही,वाहन तळ नसल्याने सावळी सदोबा मुख्य बाजारपेठ रस्त्यावर कुठेही अवैध पार्किंग सुरू असले तरी त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने वाहन चालक होईल तेथे गाडी पार्किंग करतात,वाहन अवैध पार्क केलेल्या वाहनावर शिक्षा व इतर कर मिळून हा दंड आहे,मात्र वाहतूक पोलिसांनी तथा ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करीत नाही, त्यामुळे अवैध पार्किंग वाढलेली आहे,अवैध पार्किंग व्यवस्थेला आळा घालण्याची गरज असल्याची मागणी व्यापारी वर्गांनी तसेच नागरिकांनी केली आहेत.
सावळी सदोबा येथे पार्किंग सुविधा नाहीत,नाईलाजाने वाहने रस्त्यावर पार करावी लागतात, ग्रामपंचायत प्रशासनाने पार्किंग व्यवस्था करावी,
संदीप कांबळे वाहन चालक
वाढत्या वाहनाच्या संख्येच्या तुलनेत पार्किंगची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे, रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण आहे अशावर कारवाई होणे गरजेचे आहे,
प्रदीप किनाके वाहन चालक

