Top News

Farmers who died due to electrocution in the farm shivara refrained from action by the police.....

‍‍शेत शिवारात विद्युत करंट लागल्यामुळे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांचे पोलीस यंत्रणेकडून कारवाईस टाळाटाळ.....



 विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी 



आर्णी तालुक्यातील येत असलेल्या शारी येथील शेतकरी गिरीधर परसराम जाधव वय 38 रा.शारी ता.आर्णी हे नेहमी प्रमाणे दि.25 एप्रिल रोजी बैल गाडी घेऊन शेतात गेले असता संध्याकाळपर्यंत घरी परत न आल्याने परिवारातील सदस्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली असता  शेजारीच असलेल्या आरोपी शेतकरी मधुकर पांडू  राठोड रा. इचोरा ता.आर्णी यांच्या शेत शिवारात गिरीधर यांचा मृतदेह आढळून आला होता ज्वारी भोवती विद्युत प्रवाह लागल्याने गिरीधर परसराम जाधव यांचे मृत्यू झाले होते प्रेत निपचित परिस्थितीत आढळून आले होते कुंपणाच्या तारेवर वीज प्रवाह चालू होते त्यातच त्याचा मृत्यू झाला होता हे प्रथम दर्शनी दिसून आले घटनास्थळावर परिस्थितीजन्य पुरावे सुद्धाआढळून आले परंतु आरोपीकडून पुरेपूर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असून या गंभीर घटनेची पोलीस प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नाही घटनेला दोन महिने उलठले असताना दोशीवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून मृतकांचे भाऊ दिगंबर परसराम जाधव वय 52 रा.शारी ता.आर्णी हे पोलीस स्टेशनचे येरझारा मारताना दिसत आहे हे प्रकरण 25 एप्रिल पासून सर्रास चालू आहे यात पोलीसच भक्षक होत असेल तर न्याय कोणाला मागावे हा एक प्रश्न पडलेला आहे शेवटी  मृतकांचे भावांनी स्थानिक पोलीस प्रशासन मदत करत नसल्याने पाहून शेवटी त्यांनीआपले आक्रमक रूप धारण करून आपल्यावर झालेला अन्याय जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे समोर मांडला आता या आरोपीचे नातेवाईक असल्यामुळे डॉ. गणेश जाधव हे वैद्यकीय अधिकारी यवतमाळ येथे कार्यरत आहे, यांच्या दबावाखाली डॉ.भंवंरे ग्रामीण आरोग्य केंद्र आर्णी हे दोन्ही एकाचं जिल्ह्यातील असल्याने या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचे सखोल चौकशी करण्याबाबत आयुक्तांकडे विनंती केली आहे आणि या गंभीर प्रकरणाकडे पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी दारव्हा यांनी किती गांभीर्याने लक्ष देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सदर वरील बयान मुत्युकंचे भाऊंच्या मुलाखतीत माहिती दिली आहे.

Previous Post Next Post