यादव स्वीट मार्ट ते जय भिम चौक पर्यंत चा रोड चे बांधकाम तात्काळ पूर्ण करा - प्रशांत झामरे
भारतीय युथ टायगर संघटनेच्या वतीने मुख्याधीकार्यांना निवेदन.....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
यादव स्वीट मार्ट ते जय भिम चौक पर्यंत संपूर्ण रोड खराब झाला असुन तात्काळ या रोड चे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी भारतीय युथ टायगर संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद बल्हारशाह यांना निवेदना मार्फत केली आहे.
यादव स्वीट मार्ट, बालाजी वार्ड ते डांगे गुरूजी डॉ. झाकीर हुसैन वार्ड तसेच रमाबाई चौक ते निर्दोष वाळके विद्यानगर वार्ड यांच्या घरा पर्यंत ३०० मीटर रोड चे बांधकाम पूर्ण करण्यात यावे अन्यथा भारतीय युथ टायगर संघटना तीव्र आंदोलन करनार असा इशारा भारतीय युथ टायगर संघटना विदर्भ च्या वतीने देण्यात आला आहे.
या वेळी भारतीय टायगर संघटना विदर्भ चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत झांमरे, दर्शन मोरे, सूरज चौबे, मनोज बालमवार, रतन फुलकर, राज खान, मोहित डंगोरे, साहिल घीवे, संकेत चौधरी निखील वडस्कर, प्रज्वल गौरकर उपस्थित होते.
