अति वेगात येणाऱ्या दुचाकीची कारला जोरदार धडक........दोघांचा मृत्यु......
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
नागपूर हायव्ये रोड घोडपेठ जवळी नायरा पेट्रोल पंप समोर आज सकाळी 10.30 ते 11.00,च्या सुमारास दोन विद्यार्थी भद्रावती वरून चंद्रपूर कडे महाविद्यालयाचे पेपर देण्याकरीता येत असताना या विद्यार्थ्यांची गाडी इतकी वेगवान होती की घोडपेठ जवळ त्यांच्या समोर चार चाकी गाडी जात असतांना, या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरून चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोर जात असलेल्या चार चाकी गाडीला मागून जोरदार धडक दिली धडक ईतकी जोरदार होती की चार चाकी च्या मागचा भाग पूर्णपणे उध्वस्त झाला आणि या धडकेमध्ये दोन्ही महाविद्यालयीन युवक गंभीर जखमी झाले.
युवकाचे नाव यश दिनकर देवाळकर वय - 19 तर करण सुधाकर जुलमे वय - 28 असे असून, अपघात झालेल्या युवकांना स्थानीक नागरीकांनी चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयात आणले रुग्णालयात आणल्यावर येथील डॉक्टरांनी या दोन्ही युवकांना मृत घोषित केले. सदर घटनेची माहीती परिवाराला मिळताच त्यांचावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

