नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना त्वरित मदत द्यावी तहसीलदारांना निवेदन....
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
पैनगंगा नदी काठावरील गावांचे पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना व घरांचे नुकसान झाले, पावसाळा उशिरा सुरू झाल्या मुळे पेरणी ला उशिरा सुरूवात करण्यात आली शेतकर्यांनी कशीबशी पेरणी केली व पीक चांगल्या प्रकारे उगवायला सुरुवात झाली होती परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे नदी नाले भरुन वाहत आहे ह्या दोन तीन दिवसात पैनगंगा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्या मुळे महापुर आलेला आहे या पुरामुळे कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या शेकडो गावांना नदीच्या पाण्याने वेढा घातला असून या मुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच घरा मध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे तरी शासनाने नागरिकांचे पंचनामे करून त्वरित मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे कोरपना तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, संभाजी कोवे, सिताराम कोडापे, गणेश मडावी, घनश्याम नांदेकर, सुरेश मालेकर, प्रशांत घोडाम,सतीश गोनलावर, गजानन पेंदोर, लक्ष्मण कुंमरे, राजेश्वर बेलादी, जयवंत देवडागले, नारायण मडावी, रामजी पेदोर, मंगेश सोयाम, लक्ष्मण कुरसंगे, रामदास पंधरे, चंपतराव यडमे, बंडू कुंमरे, सुदर्शन आडे, तसेच तालुक्यातील इतर शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

