Top News

Under the chairmanship of MP Ashok Nete, a review meeting was held at the Panchayat Samiti hall in Amgaon.

खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह ता.आमगांव येथे आढावा बैठक संपन्न......

 

अधिकाऱ्यांना धारेवर धरून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून लवकरात लवकर मार्गी लावा - खा.अशोक नेते


केंद्र शासनाच्या कल्याणकारी विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यात यावा.



बल्हारशाह तालुक्यात चितळाची शिकार करणे पडले महागात ; तिन आरोपींना वन विभागाने घेतले ताब्यात.....

  विदर्भ माझा न्युज 24 - आमगांव  


खा.अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह आमगांव येथे समस्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आढावा  घेण्यात आला.

 तालुक्यातील शहरी व ग्रामीण घरकुल योजनेसह प्रधानमंत्री आवास योजना- शहरी व ग्रामीण पुरस्कृत योजना राबविली जाणार आहे. प्रधान मंत्री आवास योजना- शहरी व ग्रामिण घरकुल योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

बल्हारशाह तालुक्यात चितळाची शिकार करणे पडले महागात ; तिन आरोपींना वन विभागाने घेतले ताब्यात.....

केंद्रशासनाच्या कल्याणकारी योजने संबधित आढावा घेतांना सर्वसामान्य जनतेला योजनेचा लाभ मिळावा  यासाठी प्रशासकीय अधिकारी यांनी कोणतीहि हयगय न करता सर्वसामान्य जनतेपर्यंत योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावा अशा सूचना याप्रसंगी खा.अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


खा.अशोक नेते यांनी अध्यक्षस्थानावरून बोलतांना केंद्र शासनाच्या जनकल्याण योजना  ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून लाभ मिळवून देण्यात यावा.व सामान्याचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे.

या सभेला तालुक्यातील इतर सर्व संबंधित विभागातील प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी  प्रमुखांनी उपस्थित राहून आपल्या विभागातील योजना निहाय व इतर आवश्यक बाबीचा अहवालासह समेत या सभेद्वारे तालुक्यातील जनतेच्या जास्तीत जास्त समस्या सोडविणे साईस्कर होईल या दृष्टीने आपले विभागाशी संबंधीत सर्व अद्यावत माहीतीसह अधिकाऱ्यांनी दयावे. अशी सुचना या प्रसंगी खा.अशोक नेते यांनी दिल्या

यावेळी प्रामुख्याने खासदार अशोक नेते यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले

यावेळी खा.अशोक नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,माजी आमदार भेरसिंह नागपुरे, माजी आमदार संजय पुराम, माजी जि.प.अध्यक्ष गोंदिया विजय शिवनकर,पं.समिती सभापती आमगांव राजेंद्र गौतम,पं.स.उपसभापती नोहरलाल चौधरी,भाजपा तालुकाध्यक्ष आमगांव काशिराम हुकरे, तहसिलदार आमगांव एस.जी.वेलादि,गट.वि.अधिकारी के.एम.रहांगडाले,ता.महामंत्री नरेंद्र वाजपेयी,ता.उपाध्यक्ष घनश्यामजी अग्रवाल,विधानसभा समन्वयक यशवंत मानकर, ता.महामंत्री राजु पटले,ओबीसी आघाडी महामंत्री सुधीर पटले,ता.महामंत्री राकेश शेंडे, भाजपा युवा मोर्चा महामंत्री हितेश डोंगरे,भाजपा महिला ता.महामंत्री अंजली जांभुळकर,महिला मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष मोहिनी निंबार्ते,ता.महामंत्री अनिरुद्ध शेंडे, उमेश रहांगडाले, तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post Next Post