बल्हारशाह तालुक्यात चितळाची शिकार करणे पडले महागात ; तिन आरोपींना वन विभागाने घेतले ताब्यात.......
आरोपींनी चितळाचे शिंगासह मुंडके, चामडे व पाय ठेवेले होते जंगलातच लपवून.....वन विभागाने केले जप्त.....
बल्हारशाह वनपरिक्षेत्राच्या उपक्षेत्राच्या अंतर्गत उमरी (सातारा-भोसले) गावातील घटना.....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
दिनांक 28/09/2022 रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन बल्हारशाह परिक्षेत्रातील उपक्षेत्र उमरी मधील सातारा भोसले गावात नामे ज्ञानेश्वर विश्वनाथ गावंडे रा. सातारा भोसले यांचे घरी धाड टाकुण झडती घेण्यात आली. झडती दरम्यान त्यांचे घरात वन्यप्राण्याचे मांस (सुकवा) मिळुण आले. सदर मासांबाबत अधिक चौकशी केली असता सदर मांस हे चितळ वन्यप्राण्याचे असुन सरकारी जंगलातुन आणले आहे व सदर वन्यप्राण्याची विल्हेवाट लावणेकामी आरोपी कैलाश बाबुराव कन्नाके रा. सातारा भोसले व आरोपी श्रीनिवास विठ्ठल पेंदोर रा. सातारा भोसले यांचा सुद्धा सहभाग असल्याची माहिती मिळाली. तेव्हा सदर घटनेत वापण्यात आलेले साहित्य ( लोखंडी कुऱ्हाड -2 , सुरा -1 व बांबुचा ताटवा -1 ) जप्त करण्यात आले.
सदर घटनेतील तिनही आरोपींना ताब्यात घेऊन प्राथमिक वनगुन्हा क्रमांक 08953/223806 दिनांक 28/09/2022 अन्वये भारतीय वन्यप्राणी ( संरक्षण ) अधिनियम 1972 चे कलम 39, 48 व शिक्षा कलम 51 अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला. आरोपींना रात्रौ पोलिस ठाणे उमरी पोतदार येथे वनकर्मचाऱ्यांचे निगरानित ठेवण्यात आले.
दिनांक 29/09/2022 रोजी सकाळी 09.00 वा. आरोपींना मोकास्थळी नेऊन अधिक चौकशी केली असता आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी लपवुन ठेवलेले चितळ वन्यप्राण्याचे अवयव (शिंगासह मुंडके, चामडे व पाय) जप्त करण्यात आले.
सदर अवयव ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करुन दहन करण्यात आला. व आरोपींना मा. विद्यमान मा . न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय पोंभुर्णा यांचे कोर्टात सादर करण्यात आले.
सदर प्रकरणाचा पुढील तपास श्रीमती. श्वेता बोड्डु, उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर,श्रीकांत पवार, सहाय्यक वनसंरक्षक (वनी व वन्य) यांचे मार्गदर्शनात नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह हे करीत आहे. सदर सापळा रचुन करण्यात आलेल्या जप्तीच्या कार्यवाहीचे यशस्वीतेकरीता अब्बास पठाण, क्षेत्र सहाय्यक उमरी, डी. एस. बावणे, क्षेत्र सहाय्यक मानोरा, वनरक्षक कु. पायल शेडमाके, कु. जे. बि. अटेल, पि.बि. धांडे, एस. एस. नैताम, टि.ओ. कामले व इतर वनकर्मचारी यांनी केले. अशी माहीती नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह यांनी दिली.


