बल्हारशाह तालुक्यात चितळाची शिकार करणे पडले महागात ; तिन आरोपींना वन विभागाने घेतले ताब्यात.....
विदर्भ माझा न्युज 24 -बल्हारशाह
दिनांक 29 सप्टेंबर 2022 ला महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे सांस्कृतिक विभाग व समाजशास्त्र विभागातर्फे गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री पटेल , सुकेशनी मेश्राम , प्रा. सविता पवार , प्रा. पल्लवी जूनघरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्याणी पटवर्धन होत्या.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला हार व दीप प्रज्वलनाने झाली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख व समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा . शुभांगी भेंडे शर्मा यांनी केले. सदर कार्यक्रमात गरबा डान्स स्पर्धेमध्ये एकूण सात गटांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्काराचा मान रॉयल क्वीन ग्रुप यांनी पटकावला यामध्ये जानवी रघुवंशी, संध्या मस्के , संजीवनी वानखेडे , श्रुती आगलावे , श्रुती भगत , दिपाली सातपुते , अलिषा खान , आरती यादव यांचा सहभाग होता . तर द्वितीय पुरस्काराच्या मानकरी एम आर ग्रुप ठरला. यामध्ये मृणाली नळे , ऋतिका मडावी, काजल ,अर्पणा अलोने , त्रिशा मेश्राम राधिका बेनी होत्या .तर तृतीय पुरस्कार गरबा क्वीन्स
बल्हारशाह तालुक्यात चितळाची शिकार करणे पडले महागात ; तिन आरोपींना वन विभागाने घेतले ताब्यात.....
यांना मिळाला . यामध्ये स्नेहा गोर ,आचल टेकाळे, साक्षी पाटील ,आस्था सय्यद, महेक उजवाल , विशाखा चौधरी , श्रुती लाडके , रुणाली चिपाडे यांना मिळाला. या कार्यक्रमाला वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता . मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. बालमुकुंद कायरकर , प्रा.विनय कवाडे, प्रा. पंकज कावरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

