शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित
विदर्भ माझा न्युज 24 - भंडारा
लाखणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, देशाचे जाणते राजा, राजकारणाचे सह्याद्री, शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनी तालुका व शहरच्या वतीने ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे गरीब, गरजू रुग्णांना ब्लांकेट वितरण करण्यात आले.
तसेच लाखनी बस स्थानक येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनीचे तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभने, शहराध्यक्ष धनू व्यास, असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष नरेश इलमकर सर, युवक तालुकाध्यक्ष जितेंद्र बोंद्रे, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष लतीफ शेख, लाखनी शहरचे नेते बबलू निंबेकर, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास बोरकर, निलेश गाढवे, शशिकांत भोयर, दीपकजी लांडगे, विभा हजारे, झलके, मनोज पोहरकर, नरेंद्र चोले, अशोक हजारे, सुनील बर्वे, सचिन उके, विजय चाचेरे, अरमान धरमसारे, आरिफ बेग, बोरकर जी उपस्थित होते.