राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनी तालुका व शहरची आढावा बैठक संम्पन्न
विदर्भ माझा न्युज 24 - भंडारा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनी तालुका व शहरची जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत उमेदवारांची आढावा बैठक संताजी मंगल कार्यालयात घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जेष्ठ नेते दामा खंडाईत, तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभने, लाखनी शहर अध्यक्ष धनु व्यास, जेष्ठ नेते उमराव आठोडे, भंडारा तालुकाध्यक्ष नंदु झंझाड, असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष नरेश इलमकर , ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नागेश पाटील वाघाये,
महिला तालुकाध्यक्ष अर्चना ढेंगे, लाखनीचे जेष्ठ नेते बबलु निंबेकर तसेच सर्व उमेदवार आपल्या समर्थकांसह उपस्थित होते. याप्रसंगी सर्व उमेदवारांना निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच उमेदवारांनी कार्यकर्त्यां आपल्या क्षेत्रातील अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊन प्रचार करण्याचे आवाहन करण्यात आले.