स्वतंत्र विदर्भ राज्य केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही ! म्हणून जय विदर्भ पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
केंद्र सरकारने दोन दिवसाआधी लोकसभेत विदर्भाच्या प्रश्नाच्या उत्तरार्थ केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांच्यामार्फत सांगितले की विदर्भ राज्य निर्मिती हे केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही. या वक्तव्याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पार्टीच्या वतीने आज दिनांक ०२ डिसेंबर २०२१ ला पार्टी अध्यक्ष श्री. अरुण केदार यांच्या नेतृत्वात केन्द्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी वेगळा विदर्भ झालाच पाहिजे , केंद्र सरकार मुर्दाबाद ,BJP सरकार मुर्दाबाद ,कटेंगे मगर हटेंगे नही ,विदर्भवादी हक मांगते - नही किसीसे भीक मांगते , जय जय विदर्भ चे नारे देण्यात आले व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला .
विदर्भाचे आंदोलन १०९ वर्ष्यापासून सुरु असताना व १९९७ ला भुवनेश्वर येथे झालेल्या भाजपा च्या राष्ट्रीय अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मा. महामहिम राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मांडला होता व पारितही करून घेतला असता त्यावेळीच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारने विदर्भ वगळता ३ नवे राज्य उत्तराखंड , झारखंड व छत्तीसगड दिले परंतु सरकार अल्पमतात असल्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामुळे विदर्भ राज्य निर्माण करता आले नाही .
२०१० ते २०१४ पर्यंत भाजपा ने स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा जोरात उचलून घेतला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांनी त्याचे नेतृत्व केले व सोबतच तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन गडकरी यांनी जनतेला लिहून दिले की राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता आली तर आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य १०० दिवसात मिळवून देऊ, परंतु २०१४ ते २०२१ पर्यंत ७ वर्षाच्या कालावधीत भाजपच्या नेत्यांच्या मुखातून विदर्भाबद्दल एक शब्द सुद्धा निघाला नाही आणि विदर्भाच्या मुद्द्याला त्यांनी फक्त मत मिळवून घेण्याकरिता जनतेची फसवणूक करून त्यांच्या भावनेशी खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी हंसराज अहिर, अशोक नेते, नाना पटोले अनेकदा अशासकीय ठराव लोकसभेत मांडला या सर्व बाबीची भाजपा सरकारला विसरण का ? जेव्हा कि विदर्भाची जनता स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सातत्याने लावून धरत आहे.
यावेळी जय विदर्भ पार्टी अध्यक्ष, श्री. अरुण केदार यांनी सांगितले की भाजपाचा विदर्भाप्रती धूलमूल रवैया समोर आला व विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात केला. आता जनता यांना यांची जागा दाखवेल . भाजपा असो व काँग्रेस असो यांनी आजपर्यंत राज्यनिर्मिती आयोग बसवले पण त्या आयोगाच्या शिफारसींना नाकारण्याचा काम सुद्धा यांनीच केले म्हणून आता या विदर्भद्रोही पक्षांना विदर्भातून हद्दपार करण्याची गरज आहे त्याकरिता वैदर्भीय जनतेला जय विदर्भ पार्टीच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भ राज्याकरिता व विदर्भाच्या सर्वांगीण विकासाकरिता पर्याय देण्यात आलेला आहे .
केंद्र सरकारच्या प्रतिरूप पुतळ्याचे दहन करताना जय विदर्भ पार्टी अध्यक्ष अरुण केदार , महासचिव विष्णू आष्टीकर , कोषाध्यक्ष सुयोग निलदावार, उपाध्यक्ष मुकेश मासूरकर , सहसचिव गुलाबराव धांडे,वीराआंस झोपडपट्टी विभाग अध्यक्षा ज्योती खांडेकर , कोअर कमेटी सदस्य अशोक पाटील , नरेश निमजे, राजेंद्र सतई, मुन्ना महाजन , सुधा पावडे , गणेश शर्मा , विजय मौदेकर, अरविंद भोसले, भारत बाविस्टाले, प्यारूभाई उर्फ नौशाद हुसैन, अशोक पटले , रामभाऊ कावडकर, प्रवीण डांगे, श्रीकांत दौलतकर , नीलकंठ अंभोरे , अतुल रणदिवे, आनंद निखार सह आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.