Top News

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार.....पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

अल्पवयीन विद्यार्थिनीवर  अत्याचार.....पालांदूर  पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना



नराधम युवकावर गुन्हा दाखल




विदर्भ माझा न्युज 24 - भंडारा



 लाखणी तालुक्यातील पालांदूर पोलिस स्टेशन च्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन पीडितेस आई वडिलांना  ठार मारण्याची  अशी धमकी  देत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. पीडितेच्या फिर्यादीवरून पालांदूर   पोलिसांनी ओमेंद्र श्रीपत द्रुगकरवय २८  वर्षे रा.मऱ्हेगाव याचे वर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

            तालुक्यातील एका गावात  पीडित १६ वर्षीय विद्यार्थिनी आपले कुटुंबासह वास्तव्यास आहे. आर्थिक स्थिती हलाखीची असून ती १० व्या वर्गात शिक्षण घेत आहे. दि. २४ नोव्हे. ला मध्यरात्री १२ वाजताच्या दरम्यान व रविवारी (ता. २८ ) चे १० वाजता दरम्यान  पीडितेला तु माझ्या सोबत शारीरिक संबंध केले नाही तर तुला व तुझ्या आई वडिलांना जीवाने ठार मारीन अशी धमकी देत पीडितेच्या दोन्ही डोळ्यांच्या खाली मारून जबरी लैंगिक अत्याचार केला.

 घटनेची माहिती सोमवारी ( ता. २९ )  सायंकाळच्या सुमारास  पीडितेने आपल्या वडिलांना दिली. वडिलांनी लगेच पोलिस स्टेशन गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस सावंत यांनी पीडितेची आस्थेने विचारपूस केली व नराधमाविरुद्ध  पीडित विद्यार्थिंनीच्या  फिर्यादीवरुण  पालांदूर पोलिसांनी अप. क्र. १६४/२०२१ कलम ३७६, ३२३, ५०६ भादवी सहकलम ४,६ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास परि. पोलिस उपनिरीक्षक गौरी उईके करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत त्या नराधमास पोलिसांकडून अटक करण्यात आली नव्हती.

या  नराधमाने  ६ महिन्याआधी पीडिते सोबत असाच अत्याचार केला होता. त्याची पोलिसात तक्रार करण्यात आली. मात्र पोलिसांकडून त्याच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे हा प्रकार घडल्याचे वडिलांनी संगितले आहे.

Previous Post Next Post