भाजपचे प्रशिक्षण वर्ग शिबिर लाखनी येथे संपन्न
विदर्भ माझा न्युज 24 - भंडारा
भारतीय जनता पक्षाच्या भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे 2 दिवसीय शिबिराचे उद्घाटन माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर होते. या प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, आधुनिक काळातील निवडणूक कौशल्य, संघटन कौशल्य व राजकीयदृष्ट्या आवश्यक बाबींवर प्रशिक्षण देण्यात आले. अनेक कार्यकर्त्यांच्या बलिदानातून हा पक्ष मोठा झालेला आहे. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचा वारसा टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपण सर्व कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन डॉ. कोठेकर यांनी केले.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेखा भाजीपाले, ओबीसी आघाडीचे सरकारवर टीका करत महाराष्ट्रातील प्रदेश उपाध्यक्ष राजेश बांते, किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, कुंडलिक गिऱ्हेपुंजे, साकोली नगराध्यक्ष धनवंता राऊत, जिल्हा महामंत्री हेमंत देशमुख, प्रशांत खोब्रागडे, पद्माकर बावणकर, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष टिळक वैद्य, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कोमल गभने, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष इंद्रायणी कापगते, उल्हास फडके, अरविंद भालाधारे, नेपाल रंगारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे यांनी केले. संचालन जिल्हा प्रशिक्षण प्रमुख अंगेश बेहलपांडे यांनी केले.