Top News

आज एक वार्ड-एक पार्षद साठी व्हेरायटी चौकात निदर्शने - विदर्भ राज्य आंदोलन समिती.

आज एक वार्ड-एक पार्षद साठी व्हेरायटी चौकात निदर्शने - विदर्भ राज्य आंदोलन समिती.


 महापालीका निवडणूकीत “आम्हाला नको प्रभाग पद्धत”, “आम्हाला हवी वार्ड पद्धत”





विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर 


महाराष्ट्रातील येत्या कार्पोरेशनच्या निवडणूकीत महाराष्ट्र सरकारने प्रभाग पद्धतीने निवडणूका घेण्याचा जो जनतेवर अन्याय करणारा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला विरोध करून “एक वार्ड-एक पार्षद” याच पद्धतीने निवडणूका घ्यावा या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पार्टी यांच्या संयुक्तपणे 9 ऑक्टोबरला शनिवारी दुपारी 11 वा. गांधी पुतळा, व्हेरायटी चौक, सिताबर्डी, नागपूर येथे निदर्शने करण्यात येणार आहे. या निदर्शने आंदोलनाला विदर्भ आंदोलनाचे नेते व जय विदर्भ पार्टीचे संस्थापक अध्यक्ष श्री. राम नेवले उपस्थित राहणार आहे.

मुंबईला वार्ड पद्धत तर नागपूरसह इतर महानगर पालीकेमध्ये प्रभाग पद्धतीने निवडणूका घेणे म्हणजे एकाच राज्यात दुहेरी निवड पद्धत कशी? व कां? असा प्रश्‍न तयार होतो. प्रभाग पद्धतीच्या निवडणूका म्हणजे श्रीमंत पक्षच निवडणूकीत उतरू शकतात, व तेच सत्तेवर येऊन पुन्हा भ्रष्टाचाराला वाव मिळतो म्हणून ही पद्धत लोकशाहीचा खून करणारी सामान्य कार्यकर्त्याला निवडणूकीपासून दूर ठेवणारी, जनतेवर अन्याय करणारी पद्धत आहे याचा विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पार्टी विरोध करते व मागणी करते की, “एक वार्ड-एक पार्षद” या पद्धतीनेच निवडणूका घ्याव्या या करीता हे निदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे.

मोठ्या संख्येने या आंदोलनात सामान्य कार्यकर्त्यांनी सुद्धा सामील व्हावे असे आवाहन जय विदर्भ पार्टी व विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे.


Previous Post Next Post