Top News

वाघाच्या हल्यात शेतकरी जखमी....चिंतलधाबा बिटातील ‌घटना.

वाघाच्या हल्यात शेतकरी जखमी....चिंतलधाबा बिटातील ‌घटना.




विदर्भ माझा न्युज 24 - चिंतलधाबा



      पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चिंतलधाबा बिटातील शेतशिवारा नजीक  पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. 

  वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चिंतलधाबा बिटातील कक्ष क्रमांक ९७ वनक्षेत्रा नजीक   शेतात बसून गजानन शिवराम मोरे वय (५५) रा. चिंतलधाबा हा शेतात गुरे चारत असतांना झुडपाखाली दबा धरून बसलेल्या  पट्टेदार वाघाने  त्याचावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले.


घटनेची माहिती मिळताच गावकरी व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

 जखमीला तात्काळ पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर जखम असल्याने त्यांना तात्काळ चंद्रपूर ला उपचारासाठी पाठविण्यात आले. पुढील तपास वनविभाग करीत आहे.




Previous Post Next Post