Top News

काँग्रेस नेते स्वर्गीय. संजय पाटील मारकवार यांच्या मुलगा अनिकेत पाटील मारकवार यांच्यासह इतर युवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीररीत्या प्रवेश

काँग्रेस नेते स्वर्गीय. संजय पाटील मारकवार यांच्या मुलगा अनिकेत पाटील मारकवार यांच्यासह इतर युवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीररीत्या प्रवेश




विदर्भ माझा न्युज 24 - मुल




  काँग्रेस नेते स्वर्गीय. संजय पाटील मारकवार यांचा मुलगा अनिकेत पाटील मारकवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महिला अध्यक्ष सौ बेबीताई उईके, राष्ट्रवादी काँग्रेस बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष श्री सुमित सुरेशराव समर्थ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून  अनिकेत संजय मारकवार व इतर बहुसंख्य युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केले. अनिकेत संजय मारकवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे ग्रामीण भागातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे.   अविनाश सावसाकडे, अशोक कोरेवार, वासू कनकलवार, आकाश अरेवार, सतीश केदार, आकाश लंबुवार, किशोर राऊत, आशिष यारेवार, महादेव नरुले, पवन उरकुडे व इतर बहुसंख्य युवकांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीररीत्या प्रवेश केले.                            मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमित सुरेशराव समर्थ  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुल शहरातील व ग्रामीण भागातील बहुसंख्य युवक व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले आहे. या पक्ष प्रवेशामुळे शहरात व ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा जोर वाढत असल्याचे दिसून येत आहे. पक्ष प्रवेश करतेवेळी   महिला चंद्रपूर शहर अध्यक्ष सौ. ज्योतीताई रंगारी, चंद्रपूर चे माजी नगराध्यक्ष चे श्री दीपक जी जयस्वाल, मुल शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगटे व इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post Next Post