नामांकित कॉमन लाँ ॲडमिशन टेस्ट मध्ये सोनिया कवाडे उत्तीर्ण .
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
देशात कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कॉमन लाँ ॲडमिशन टेस्ट मध्ये विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली या दुर्गम भागातून सोनिया कवाडे उत्तीर्ण झाली.
चंद्रपूर येथील ऍड. मनोज कवाडे व ऍड. वैशालीताई टोंगे कवाडे यांची कन्या सोनिया हिने कॉमन लाँ ॲडमिशन टेस्ट ( CLAT)ची परीक्षा उत्तीर्ण करून देशातील नामांकित कॉलेज पैकी नागपूर येथील नॅशनल कॉलेज ऑफ लॉ येथे एलएलबी ऑनर्स अंतर्गत ऍडजुडीकेशन अँड जस्टीसिंग या अभ्यासक्रमात देशातील साठ जणांच्या यादी मध्ये सोनियाने स्थान मिळविले हे विशेष. या परीक्षेत व विशेष अभ्यासक्रमात विदर्भातील चंद्रपूर गडचरोली या दुर्गम भागातून यश मिळविणारी सोनिया ही प्रथम विद्यार्थिनी आहे.
या यशाबाबत नुकताच लिफ या संघटने मार्फत सोनिया हिचा सत्कार करण्यात आला यावेळी लीफ चे अध्यक्ष ऍड फराद बेग ,ऍड सातपुते व ऍड हजारे उपस्थित होते तसेच चंद्रपूर येथिल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत वैद्य व इतर पदाधिकाऱ्यान मार्फत सुद्धा सोनियाचा सत्कार करण्यात आला.
सोनियाच्या यशाबद्दल डॉ ऍड अंजली साळवे,ऍड अमोल टोंगे ,श्री पी के टोंगे,सौ आशा ताई टोंगे यांनीसुद्धा अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
