ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा येथे भा.ज यु.मो चे फलक अनावरण कार्यक्रम संपन्न.
वक्तृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर नेतृत्व करण्याची संधी फक्त भारतीय जनता पक्षात मिळते - जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे
विदर्भ माझा न्युज 24 - ब्रम्हपुरी
बल्लारशाह विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार, ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांची युवा संकल्प यात्रा सुरू आहे. या अंतर्गत भा.ज.यु.मो ब्रम्हपुरी तालुक्यातील जुगनाळा येथील फलक अनावरण कार्यक्रम आशीष देवतळे यांच्या हस्ते पार पडले. या नंतर कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली. या प्रसंगी आशिष देवतळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी भा.ज यु.मो तालुका अध्यक्ष तथा पं. स सभापती रामलाल दोनाडकर, सरपंच लक्ष्मीबाई सहारे, उपसरपंच गोपाल ठाकरे, देविदास कार, मधुकर ढोरे युवा अध्यक्ष जुगणाला शाखा, जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ननावरे, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा कार्य. सदस्य लिलाराम राऊत, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, कामगार आघाडी नेते मनीष रामील्ला, उपस्थित होते. यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

