वन्यजीव सप्ताह निमित्ताने खंडाळा येथील जंगलात वनविभागाकडून राबवण्यात आलेल्या उपक्रमात वनराई बंधारा बांधण्यात आला.
विदर्भ माझा न्युज 24 - पुसद
दि. 5 ऑक्टो. रोजी वन्यजीव सप्ताह निमित्ताने खंडाळा येथील जंगलात वनविभागाकडून राबवण्यात आलेल्या उपक्रमात वनराई बंधारा बांधण्यात आला. ज्यामुळे प्राणी व पक्षांसाठी एक दीर्घकाळ पाण्याचा साठा उपलब्ध होईल व प्राण्यांना पाण्यासाठी भ्रमंती करण्याची वेळ येणार नाही, किंवा काही काळासाठी का होईना प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल व प्राणी व पक्षांना या वनराई बंधाऱ्याचा उपयोग होईल.
हा उपक्रम वनविभागाने घेतला या उपक्रमात MH 29 हेल्पिंग हॅण्डस् वाईल्ड ऍडव्हेंचर अँड नेचर क्लब शाखा पुसद ने देखील सहभाग घेतला . व या उपक्रमाला हातभार लावून श्रमदान केले.
यावेळेस वनविभाग चे सोकुसरे उपवनसंरक्षक , राऊत वनपरीक्षेत्र अधिकारी पुसद, निथळे फिरते पथक पुसद व स्टाफ , शेख मुखबिर क्षेत्र सहाय्यक खंडाळा, वनरक्षक देवठे , वनरक्षक पठाण, व अरविंद राठोड , एन डी राठोड , सी जी जाधव वनकामगार , MH29 हेल्पिंग हॅण्डस् चे पुसद तालुका अध्यक्ष दिनेश पिंपरे, गुड्डू राऊत , कोब्रा ऍडव्हेंचर चे प्रीतम कांबळे, अक्षय भुसारे उपस्थित होते .