Top News

हिंगनघाट आगार येथे बेमुद्दत उपोषण

हिंगनघाट आगार येथे  बेमुद्दत उपोषण



विदर्भ माझा न्युज 24 - हिंगनघाट



हिंगनघाट आगार‌ वर्धा  विभाग,संयुक्त कृती समिती तर्फे दी. 28/10/2021 ला राष्ट्रपीता महात्मा गांधी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला माल्यार्पन करून व अनियमीत तुटपुंज्या वेतनापाई 26 एस.टी. कर्मचार्यांनी कंटाळुण आत्महत्या केल्या त्यांना श्रद्धांजली अर्पण करूण कामगारांच्या रास्त मागण्यांची सोडवणुक करण्यासाठी हिंगनघाट आगार येथे  बेमुद्दत उपोषणास काल सकाळी  10:00 वाजता सुरवात करण्यात आली जो पर्यंत रास्त मागण्या मंजुर करण्यात येनार नाही तो पर्यंत बेमुद्दत उपोषण सुरु ठेवण्याचा संयुक्त कृती समीती व कामगारा तर्फे निर्धार करण्यात आला. 



सदर आंदोलनात  5% महागाई भत्ता बोळवन माण्य नाही, राज्य शासनाप्रमाणे लागु झालेला 28% महागाई भत्ता एकरक्कमी देण्यात यावा, वार्षीक वेतनवाढीचा दर 2% टक्यावरुन 3% करण्यात यावा, राज्यशासनाप्रमाणे घरभाडे भत्ता दर 8%, 16%, 24% करण्यात यावा, राज्य परीवहन  कामगारांना नियमीत देय्य असलेले वेतन महीण्याच्या 7 तारखेला देण्यात यावे. अश्या मागण्यांना घेऊन सदर बेमुद्दत उपोषन करण्यात आले.

Previous Post Next Post