अटल बिहारी वाजपेयी मार्केट ला नगराध्यक्ष हरीश शर्मा यांची भेट
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
माजी अर्थ नियोजन व वन मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातुन शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी अंतर्गत साकारण्यात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी मार्केट ला नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी काल दी. 29 ऑक्टोंबर ला भेट दीली
माजी अर्थ नियोजन व वन मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी अंतर्गत नगरपालिके द्वारा किरकोळ भाजीपाला विक्रेत्यां करिता स्थायी स्वरुपी सोय व्हावी करिता बांधण्यात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी मार्केट ला नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी भेट दिली त्याच बरोबर मार्केट ची पहानी करून भाजी विक्रेत्यांशी संवाध साधला
यावेळी विक्रेत्यांनी सुधीर मुनगंटीवारचे आभार मानत सांगितले की ऊन पाऊस व थंडीत व्यवसाय करतांना अत्यंत कठीण समस्यांना समोरा जावे लागत होते परंतु आज सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या या अटल बिहारी वाजपेयी मार्केट मुळे अनेक समस्यांचे निराकरण झाले सुधीर मुनगंटीवार यांचे मानावे तितके आभार कमीच पडेल अशा भावना विक्रेत्यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी भाजीपाला विक्रेते व नागरिकांशी संवाद साधला. या प्रसंगी काशीनाथ सिंह व हरेराम सिंह हे उपस्थित होते.