Top News

रामपूर - गोवरी व कापनगाव - आर्वी मार्ग खड्डेमुक्त करा

रामपूर - गोवरी व कापनगाव - आर्वी मार्ग खड्डेमुक्त करा 


संकल्प फाउंडेशन ची निवेदना मार्फत  सार्वजनिक बांधकाम विभागाला मागणी 


15 दिवसात मार्ग सुरळीत करा अन्यथा आंदोलन करण्याचा दिला  इशारा 




विदर्भ माझा न्युज 24 - राजूरा



रामपूर - गोवरी व कापनगाव - आर्वी मार्गावर  असंख्य जीवघेणे खड्डे पडले आहेत या रस्त्यावरून असंख्य नागरिकांना प्रवास करावा लागतो नागरिकांना प्रवास करताना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे  रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आसा संभ्रम नागरिकांन मध्ये निर्माण झाला आहे येवढ च नाही तर या मार्गावर प्रवास करतांना रामपूर माथरा वळणावर अपघात झाला व त्यात 2 घांना आपला जिव सुद्धा गमवावा लागला  या गंभीर समस्या ची  दखल घेण्यात यावी या साठी संकल्प फाउंडेशन तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले.  व त्यांनी सुद्धा या वर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर काम सुरु करू अस आश्वासन दिले या वेळी प्रामुख्याने संकल्प फाउंडेशन सुरज गव्हाने, उज्वल शेंडे, उत्पल गोरे, दिपक झाडे, साईनाथ पिंपळशेंडे, अंकुश मस्की, प्रशांत पारखी, वैभव अडवे, वैभव महाकुलकर, दिनेश वैरागडे,  गितेश कौरासे,  ओमप्रकाश काळे  प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post Next Post