सभापती रामलाल दोनाडकर यांच्या हस्ते चेक चे वितरण
विदर्भ माझा न्युज 24 - ब्रम्हपुरी
मौजा चिचखेडा येथील रहिवासी भाऊराव जांभुळे हे दिनांक 26/ 5 /2021 रोजी सकाळी सात वाजता दक्षिण ब्रह्मपुरी रेंज अंतर्गत वांद्रा बीटात तेंदुपत्ता आणण्यासाठी गेले असता दबा धरून असलेल्या वाघाने त्यांचेवर हल्ला करून जखमी केले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला .त्यांचे पश्चात त्यांचे कुटुंबात पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचेवर आभाळ कोसळले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ब्रम्हपूरी वन विभागाने तात्काळ पाच लाख रुपयांची मदत केली. घरातील कर्ता व्यक्ती मरण पावल्यामुळे कुटुंबाची हेळसांड होऊ नये म्हणून ब्रम्हपूरी वन विभागाच्या वतीने आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे आज दिनांक 18/ 10/ 2021 रोजी ब्रह्मपुरी वन विभागाच्यावतीने पाच पाच लाखाचे दोन चेक पंचायत समिती सभापती रामलाल महादेव दोनाडकर यांच्या हस्ते अर्चना भाऊराव जांभूळे यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी कैलास लालाजी आभारे वनरक्षक वांद्रा बीट यांचेसह चिचखेडा गावातील तुकाराम जांभुळे , कृणाल जांभळे , पवन जांभुळ, सौरभ बांबोडे , गोपाल जांभुळे , प्रणय ननावरे , अविनाश रंधवे, प्रकाश बावणे सायगांव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.