Top News

बल्लारशाह शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या करिता पोलिस बला सह रुट मार्च

बल्लारशाह शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या करिता पोलिस बला सह रुट मार्च



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह



आज दिनांक 6 सप्टेंबर 2021 ला चंद्रपुर जिल्हाचे चे  पोलिस अधीक्षक अरवींद साळवे यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधीकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात तर पोलिस स्टेशन बल्लारशाह चे पोलिस निरीक्षक उमेश‌ पाटील यांच्या नेतृत्वात बल्लारशाह शहरात सकाळी 11:00 वाजता


 पोळा, ताना पोळा गणेश उत्सव दरम्यान सार्वजनिक शांतता राहावी व कसल्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या करिता पोलिस बला सह रुट मार्च काढण्यात आले, सदर रुट मार्च गोल पुलिय्या,आस्मा चौक,आंबेडकर चौक,नेहरू चौक सह इत्यादी ठिकाणी रुट मार्च काढण्यात आले,



 रुट मार्च मध्ये पोलिस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक रमीज मुलानी,सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड,पोलिस उपनिरीक्षक चांदुरे सह 45 कर्मचारी उपस्थीत होते.





Previous Post Next Post