Top News

अडेगा-खडकी सिमेंट कॉंक्रेटिकरण रस्त्याला बांधकाम विभागाची मंजुरी

अडेगा-खडकी सिमेंट कॉंक्रेटिकरण रस्त्याला बांधकाम विभागाची मंजुरी


खनिज विकास निधी मधून होणार रस्ता ६ करोड ४२ लक्ष 75 हजार अंदाजपत्रक मंजूर


खड्यात बसलेल्या उपोषण कर्त्यांनी मानले  सहकार्य करण्याऱ्याचे आभार



विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ 


यवतमाळ जिल्यातील झरी-जामनी टोकावरील अडेगाव खडकी रस्त्या संदर्भात मागील दोन दिवसापासून सुरू असलेले मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली   खड्यात बसून  उपोषणाला वाढता पाठींबा बघता अखेर प्रशासन नरमले 


अडेगाव-खडकी रस्ता संपूर्ण खड्यात गेला असून या रस्त्यांनी ओव्हरलोअड वाहतूक बंद करण्या करिता,रस्त्यावरील पूल बांधण्याकरिता,व सिमेंटकॉंक्रेटिकरन करण्या करिता बसलेल्या उपोषणाला बसले होते या उपोषणाला संपूर्ण जनतेचे लक्ष वेधले यात

पहिल्या दिवशी उपोषण कर्त्यांना बांधकाम विभागाने प्रस्ताव सादर केला पण उपोषण कर्त्याना ना मंजूर केले व दि 31/8/2021 पुन्हा बांधकाम विभाग,वाहतूक विभाग,पोलीस विभाग,तहसील विभाग आणि खदानी व उपोषण  कर्त्याचे प्रतिनिधी यांची दुपारी 4 वाजता तहसीलदार यांच्या दालनात बैठक झाली यात सर्व खदानी च्या प्रतिनिधी यांनी लेखी दिली व त्यात वाहतूक सायंकाळी 6 ते सकाळी 6 परेनंत करेल,वृक्षारोपण करण्यात येईल,रस्त्यावर पाणी मारन्यात येईल,व बांधकाम विभागाने आपला प्रस्ताव व इस्टिमेट सादर केला त्या प्रस्तावाला उपोषण कर्त्यांनी मंजुरात दिली व अडेगाव- खडकी रोड वरील ना दुरुस्त असलेलं पूल, 2.5 किमी सिमेंट कॉंक्रेटिकरण खनिज विकास निधी अंतर्गत करण्याचे प्रस्ताव सादर केला

यात 6 कोटी42 लक्ष 75 हजार बांधकाम विभागाने मंजुरी दिली यावर नायब तहसीलदार रामगुंडे साहेब,बांधकाम विभागाचे उपअभियंता राठी साहेब ठाणेदार अजित जाधव साहेब,वाहतूक विभागाचे RTO यांच्या प्रमुख उपस्थित उपोषणाची सांगता झालीसंपूर्ण जनतेचा चेहऱ्यावर आनंद व्यक्त झाल्याचे दिसून आलेमंगेश पाचभाई,गिरीधर राऊत,दत्ता लालसरे,राहुल ठाकूर,निखिल देठे,दत्ता भोयर,दिनेश जीवतोडे सर्वउपोषणकत्याने सर्व सहकारी,अधिकारी,पत्रकार यांचे आभार मानले

Previous Post Next Post