मी कुठे आहे हे प्राचार्याला विचारा....
दोन शिक्षकांचा वादात मदस्ती करणारा कर्मचारीच झाला बेपत्ता...
श्री.संत गजानन महाराज इंजिनिअरिंग काॅलेज चा कर्मचारी झाला बेपत्ता
विदर्भ माझा न्युज 24 - बुलढाणा
शेगाव येथील श्री. संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजचा कर्मचारी काल, २३ सप्टेंबर रोजी सकाळपासून बेपत्ता आहे. गोपाळ सुखदेव गावंडे (४८, रा. जिजामातानगर) शेगाव असे बेपत्ता कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणाची तक्रार गोपाळ गावंडे यांच्या भावाने आज, २४ सप्टेंबर रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीनुसार काल, २३ सप्टेंबर रोजी कॉलेजच्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये आपसात वाद झाला होता. हा वाद गोपाळ गावंडे यांनी मध्यस्थी करून मिटवला.
या घटनेनंतर कॉलेजच्या प्राचार्यांनी गोपाळ गावंडे यांच्या फोनवर विनाकारण व वेळोवेळी फोन केले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर गोपाळ गावंडे हे सकाळी साडेदहाच्या सुमारास घरून निघून गेले. कुठे जातो हे कुणालाही सांगितले नाही. सतत फोन करूनही उचलला नाही.
“मी कुठे आहे हे प्राचार्याला विचारा’, असा शेवटचा मेसेज गोपाळ गावंडे यांनी त्यांच्या भावाच्या फोनवर सायंकाळी टाकला. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला, असे तक्रारीत म्हटले आहे.तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.



