Top News

महावितरण च्या भोंगळ कारभाराविरोधात सोमवारी मुकुटबंन कार्यलयासमोर आंदोलन

 महावितरण च्या भोंगळ कारभाराविरोधात सोमवारी मुकुटबंन कार्यलयासमोर आंदोलन


मोठ्या संख्येने  तालुक्यातील  नागरिक उपस्थित राहण्याचे मंगेश पाचभाई यानी केले आव्हान



विदर्भ माझा न्युज 24 -  झरी जामनी 


 तालुक्यातील मागील चार महिन्या पासून वीज पुरवठा ये-जा मुळे संपूर्ण नागरिक त्रस्त आहेत ,अवाच्या सव्वा बिले,बोगस मीटर रिडींग,अश्या अनेक तक्रारी करून संपूर्ण नागरिक त्रस्त झाले आहे तरी या बोगस कारभाराविरोधात अनेक लोकांनी तक्रारी करून सुध्या कोणतेही आजपरेनंत दखल घेतल्या गेली नसल्याने अखेर तालुक्यातील युवा सामजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून येत्या 27/9/2021 ला सोमवारी मुकुटबंन विद्युत कार्यलय समोर अनोखे आंदोलन करण्याचे ठरवले आहे.


झरी-जामनी तालुक्यातील मुकुटबंन हे गाव आता शहरात रूपांतर होत असून मुकुटबंन ला बिल भरणा केंद्र,बिल दुरुस्ती केंद्र,विद्युत पुरवठा सुरळीत करणे ,अडेगाव येथील 132 kv केंद्रच काम त्वरित करणे,बिले दुरुस्ती करणे,बोगस रिडींग घेणाऱ्यावर कारवाही करणे,अश्या अनेक मागण्या या आंदोलन कर्त्याच्या असून या आंदोलनाला या आंदोलनाला  तालुक्यातील असंख्य जनता उपस्तीत राहणार असल्याचे बोलले जात आहे तसेच कुणाच्या महावितरण विरोधात समश्या असतील त्यांनी उपस्थीत राहावे असे आव्हान मंगेश पाचभाई यांनी केले आहे.

Previous Post Next Post