पराग गुंडेवार यांच्या लढ्याला यश....बल्लारशाह कील्ल्या करीता आ.सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुर केले 2 कोटी रू.
गुंडेवार यांनी मानले आ.मुनगंटीवार यांचे जाहीर आभार....
लवकरच भारतीय पुरातत्व विभागाकडुन नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त होईल व कामास सुरुवात होईल...
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
विश्व पराक्रामी महाराजा खांडक्या बल्लाळशाह राजे आत्राम यांनी १३ व्या शतकात बल्लारशाह येथिल वर्धा नदीच्या काठावर बांधलेला किल्ला बल्लारशाह शहराच वैभव आहे.परंतु प्रदीर्घ काळापासुन ताठ मानेणे उभा असलेला हा किल्ला प्रशासनाच्या दुर्लशते मुळे व निसर्गाच्या मारापुढे आज काहीसा क्षतग्रस्त होत आहे.
गेल्या काही वर्षा पासुन पराग गुंडेवार हे चांदागड चा इतीहास जोपासन्या साठी प्रसार माध्यमांच्या सहाय्याने लढत आसेत अखेर पराग सुरेश गुंडेवार यांच्या लढ्याला यक्ष प्राप्त झाले आहे.
बल्लारशाह शहरातील हा किल्ला बल्लारशहाचा वैभव असल्याने किल्याच्या संवर्धन व पर्यटनाच्या दृष्टीने बल्लारशाह विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाचे पाऊल उचले असुन विशेष निधी अंतर्गत २ कोटी रुपये मंजुर केले होते.
नगरपालिके मार्फत कामाचे टेंडर देखिल झालेले आहे. करिता सर्वेक्षण करुन नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्व विभागाची टिम सर्वेक्षणासाठी बल्लारशाह येथे आले असता नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या प्रमूख उपस्थितीत किल्याचे सर्वेक्षण करुण बैठक घेण्यात आली. लवकरच भारतीय पुरातत्व विभागाकडुन नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त होईल व कामास सुरुवात होईल असे भारतीय पुरातत्व विभागाच्या नंदिनी भट्टाचार्य साहू , रीजनल डायरेक्टर , (पश्चिम विभाग ) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण
रेड्डी साहेब , सुपरिंटेंडिंग अर्केलॉजिस्ट, नागपुर मंडल , भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ,श्रीमती शिल्पा जांगड़े , असिस्टेंट अर्केओलॉजिस्ट, नागपुर मंडल , भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी सांगीतले सदर बैठकीत विजय सरनाईक, मुख्याधिकारी, नगर परिषद बल्लारशाह ,प्रशांत शिंदे कंजरवेटिव असिस्टेंट, चंद्रपुर सब सर्किल,नागपुर मंडल , भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ,संजय बोढे मुन्सिपल इंजीनियर बल्लारशाह नगर परिषद्, संदीप पथे , प्रिंसिपल कंजरवेशन आर्किटेक्ट, सखा हे उपस्थित होते. पुरातत्व सर्वेक्षण ,संजय बोढे मुन्सिपल इंजीनियर बल्लारशाह नगर परिषद्, संदीप पथे , प्रिंसिपल कंजरवेशन आर्किटेक्ट, सखा हे उपस्थित होते.
बल्लारशाह विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाचे पाऊल उचले असुन विशेष निधी अंतर्गत २ कोटी रुपये मंजुर केले होते त्या बद्दल पराग गुंडेवार यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांचे जाहीर रीत्या आभार मानले त्याच बरोबर न.प. बल्लारशाह चे मुख्याधीकारी विजय सरनाईक,नगराध्यक्ष हरीश शर्मा,भारतीय पुरातत्व विभाग यांचे सह प्रतेक वेळेस कील्ला व इतीहासा संदर्भात बातमी प्रकाशीत करून सहकार्य केल्या बद्दल प्रसार माध्यमांचे ही मनपुर्वक आभार गुंडेवार यांनी व्यक्त केले.




