Top News

लाहान‌ भावाने केली मोठ्या भावाची हत्या..

 लाहान‌ भावाने केली मोठ्या भावाची हत्या...


शेतिच्या वादातुन काठला भावाचाच काटा..मुल तालुक्यातली घटना



विदर्भ माझा न्युज 24 - मुल

मुल तालुक्यातील सिंतळा येथे शेतीच्या जुन्या वादामधुन लहान भावाने मोठ्या भावाला यमसदनी पाठविल्याची घटना घडली आहे.

 सिंतळा येथील रहीवाशी विश्वनाथ पुंजाराम वैरागडे (वय ६५) आणि सुनिल पुंजाराम वैरागडे (वय ४२) दोघेही सख्खे भाऊ आहेत. दोघांमध्ये अनेक वर्षापासुन वडीलोपार्जीत शेतीचा वाद सुरू आहे. याच वादामधुन लहान भाऊ सुनिल वैरागडे याने मोठा भाऊ विश्वनाथ वैरागडे याला ठार केले आहे.

सुत्रांकडुण मिळालेल्या माहीती नुसार सविस्तर वृत्त असे आहे की आज दुपारी ११.३० वा. चे सुमारास विश्वनाथ म्हशी (buffalo) घेवुन घराकडे जात असताना सिंतळा रेगडी मार्गावरील नाल्याजवळ दबाधरुन बसलेल्या सुनिलने पाठीमागुन येवुन कुऱ्हाडीने विश्वनाथच्या डोक्यावर वार केले. कुऱ्हाडीचे वार जबर असल्याने विश्वनाथ याने जागीच प्राण सोडले.

घटनेची माहीती मिळताच पोलिस निरीक्षक सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांनी सहकार्यांसह घटनास्थळ व सिंतळा येथे जावुन सुनील वैरागडे याला ताब्यात घेतले आहे. मृतक विश्वनाथचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालय मूल येथे घेवुन आले असुन. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे करीत आहेत.

Previous Post Next Post